Tuesday, 16 August 2011

This is a trbute to those who are made house-less without any crime done ....

सुंदरसे एक गाव होते
गावाला एक नाव होते
तेच डोंगर तेच खोरे
नद्या झाडे तसेच सारे

लवकर सकाळी उठायचं
अंघोळीचा आवरायचं
कळशी हंडा भरायचा
दिवस असाच सरायचा

शेतात सकाळी जायचं
राब राब राबायचं
बाईने आणलेली आर्धी भाकरी
तीही सारं पोट भरायची

संध्याकाळी मात्र सारे
निसर्गाचे घेती वारे
लपाछापि सूर पारंब्या
हुतुतू अन आट्यापाट्या

थकून भागून आलेला गडी
रात्री उशिरा घ्यायचा पडी
परत चिंता उद्याची
कुणाला नाही सांगायची

देव देवता सगळे एकंच
पाऊस नसेल तर नसेल पीकच
निसर्गालाच देव मानायचं
असाच रोजचा जीवन काढायचं

मग अचानक एके दिवशी
होती अशाडी एकादशी
सरकारची माणसं आली
म्हणाली ,"घर करा खाली"

मोठ्या धरणाचा होता प्रकल्प
परतफेडीचे केले संकल्प
घर देतो पैसा देतो
पण ही जागा घेतो

अहो! या जागेतच तर सगळं आहे
आठवणी आहेत शेती आहे
शेती सोडून करू काय ?
बाकी काहीच येत नाय

घर द्याल. पैसा द्याल.
डोंगर द्याल? नद्या द्याल?
काम द्याल. शिक्षण .द्याल
ही माणसं द्याल? ती नाती द्याल?

शेवटी सगळे तयार झाले
सरकारच्या धाकाला भ्याले
"नाई गेलो तर आजून कावतील
काही न देता हाकलून लावतील"

माग काम सुरु झालं
गाव सारं पाण्यात गेलं
गेली ती नाती गेली ती घरं
सरकारला मनच नसतं हेच खरं

धारण आता बांधून झालं
'शहरात' वीज आणि पाणी आलं
आता मनात प्रश्न येतो
गावकर्यांचा काय झालं

ती माणसं अजूनही भटक्ताहेत
जागवणाऱ्या फाशीत अजूनही लटकताहेत
आज त्या गरिबांना आपणही बघतो
आणि सहज त्यांना 'भटके' म्हणतो

सकाळी पेपरमध्ये बातमी येते
'धारण मोहीम आता फत्ते'
आपण त्याला प्रतिसाद देतो
आणखी एक चहाचा घोट घेतो

हा अन्याय का होतो?
आस प्रश्न मी विचारतो
सुविधाच संकटाच रूप घेते
आणि मग एक मेधा पाटकरही जन्माला येते!!!

1 comment:

  1. Faar bhari kavita keliyes tu soham.
    vachli temvhahi man helavun taknari hoti, aani aajahi aahe.
    kharach......

    ReplyDelete